ऐतिहासिक माहिती

इतिहास आणि बदल

प्राचीन/मध्ययुगीन उल्लेख कमी असून, लवळे हा परिसर परंपरागतरीत्या शेतीवर अवलंबून होता. आसपासच्या भागात ऐतिहासिकदृष्ट्या मराठा-काळापासून नागरी व ग्रामस्थ जीवनाचा रुज दिसतो. लवळे गावी प्रामुख्याने पूर्वीपासून शेती हा मुख्य व्यवसाय आज पर्यंत चालू आहे. मुळशी तालुक्यामध्ये बागायती गाव म्हणून लवळे गावचे नाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पेरू, वांगी, कडबा (ज्वारी), भात, घेवडा प्रमुख पिके भरपूर प्रमाणात उत्पादित होत असल्याने ट्रक भरून मुंबई, गुजरात, पुणे या ठिकाणी विक्री साठी जात होती. तसेच जुन्या काळी ग्रामस्थ बैलगाडीने आणि डोक्यावरून शेतमालाची विक्री पुणे येथे करत होते. बैल मोटीने शेतीसाठी विहिरीतून पाण्याची व्यवस्था होत होती. सन १९६२ साली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संत सावता माळी सह. सिंचन पाणीपुरवठा योजना मुळा नदीवरून केली. त्यांचे उद्घाटन तत्कालीन आमदार मामासाहेब मोहोळ यांनी केले. तेव्हापासून लवळे गावाचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आले. व शेतीपिकाची भरभराट झाली. समाजव्यवस्था परिसरात ‘एक लवळे - बारा मावळे’ असे लवळे गावाला आजही संबोधले जाते. याचे कारण असे कि, लवळे गावात आजही बारा बलुतेदार ( अठरा पगड जातीचे ) लोक या गावात राहतात. त्यामध्ये विशेषकरून मराठा – देशमुख, माळी, ब्राह्मण, नव बौद्ध, मातंग, चर्मकार , मुस्लिम , बारा बलुतेदार- कुंभार, सुतार ,कोळी, परिट, न्हावी, सोनार, धनगर, जंगम, भराडी, गुरव, रामोशी, कैकाडी ;इतर समाज- कातकरी, नंदीबैलवाले, भुते गावातील प्राचीन वास्तू श्री. मोरया गणपती मंदिर रोटमलनाथ मंदिर श्री. घुमट मंदिर ( हेमाडपंथी वास्तू ) लवळेश्र्वर महादेव मंदिर विठ्ठल मंदिर पीरदर्गा तळमाळ विहीर घोडे खडक महानुभव खिंड पांढरा देव रामाची खीर कुस्त्यांचा आखाडा घुबडदरी - डोंगर भागाचे नाव - या डोंगरावरती घुबड पक्षांचे पूर्वी वास्तव्य जास्त होते.

ग्रामपंचायत — संचलन, जबाबदाऱ्या आणि स्थानिक प्रशासन

स्थानिक पातळीवरील ग्रामपंचायत कामांमधून त्यांचा कारकीर्द सुरू झाली. : लवळे गावची संक्षिप्त माहिती : गावाचे नाव :- लवळे अक्षांश :-७३.५२ रेखांश :-३२.६९ ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत लवळे ता.मुळशी जि.पुणे ४१२११५ ग्रामपंचायत स्थापना :- ६ जून १९५२ सरपंचाचे नाव :- श्री.निलेश हिरामण गावडे ग्रा.वि.अ.नाव :- श्री,व्ही.डी. साकोरे पं.सं. चे नाव :- पंचायत समिती, मुळशी जि.प.चे नाव :- जिल्हा परिषद, पुणे एकूण वार्डाची संख्या :- ५ एकूण सदस्य संख्या :- १५ ग्रा.पं. ई- मेल आयडी :- grampanchayatlavale1952@gmail.com

लोकसंख्या, समाजरचना व सांगाडा आकडे

लवळे ला स्वतःची ग्रामपंचायत आहे. स्थानिक विकासकामे, रस्ते, पाणीपुरवठा, शाळा व इतर सुविधा ग्रामपंचायतीतून नियोजित व अंमलात आणल्या जातात. मतदार यादीप्रमाणे एकूण मतदार :- ३९७८ पुरुष :- २०८९ स्रिया :- १८८९ लोकसंख्या (सन २०११ नुसार) :- ६७३२ पुरुष :- ३६२१ स्रिया :- ३१११ अ.जा.ची संख्या :- ७०० पुरुष :- ३६९ स्रिया :- ३३१ अ.ज.ची संख्या :- ४९७ पुरुष :- २५७ स्रिया :- २४० इतर लोकसंख्या :- ५५३५ पुरुष :- ३९९५ स्रिया :- २५४० एकूण कुटुंब संख्या :- १५३७ अ.जा कुटुंब संख्या :- २४४ अ.ज कुटुंब संख्या :- १२२ एकूण सार्वजनिक विहिरी :- २ पाणी पिण्यायोग्य विहिरी :- २ एकूण हातपंप :- १८ नळ पाणीपुरवठा योजना :- ३ टाकीची क्षमता :- ३ लाख लिटर (गावठाण) राऊत वाडी :- ७० हजार लिटर गावडेवस्ती :- १० हजार लिटर एकूण वैयक्तिक नळजोडणी संख्या :- ५७४ (सन -२०२१-२२) वैयक्तिक शौचालयाची संख्या :- १४३७ गावची नदी :- मुळा नदी तलाव संख्या :- २ गावाला लवळे नाव का पडले? याविषयी माहिती पूर्वी गावच्या परिसरात लव्हाळे वनस्पतीचे बेट होते. गावची भौगोलिक रचना महादेवाच्या पिंडाच्या आकाराची आहे. तसेच पूर्वीपासून लवळेश्वर हे महादेव मंदिर गावामध्ये स्थित आहे. या बाबीमुळे गावाचे नाव “लवळे” असे पडले आहे. समाजव्यवस्था परिसरात ‘एक लवळे - बारा मावळे’ असे लवळे गावाला आजही संबोधले जाते. याचे कारण असे कि, लवळे गावात आजही बारा बलुतेदार ( अठरा पगड जातीचे ) लोक या गावात राहतात. त्यामध्ये विशेषकरून मराठा – देशमुख, माळी, ब्राह्मण, नव बौद्ध, मातंग, चर्मकार , मुस्लिम , बारा बलुतेदार- कुंभार, सुतार ,कोळी, परिट, न्हावी, सोनार, धनगर, जंगम, भराडी, गुरव, रामोशी, कैकाडी ;इतर समाज- कातकरी, नंदीबैलवाले, भुते वाडा संस्कृती पूर्वी लवळे गावात राहण्यासाठी वाडा संस्कृती होती.. भव्य चौकोनी मातीच्या विटांची तटबंदी त्याला एकच मोठे प्रवेशद्वार. ते प्रवेशद्वार मोठ्या दगडांच्या बांधकामात होते. आखीव रेखीव प्रवेशद्वारावर लाकडी कोरीव काम केलेले चौकटी व भक्कम दरवाजे असायचे. त्यामध्ये प्रामुख्याने खालील वाड्यांचा समावेश होतो. १) काशीलकर वाडा ९) गावडे वाडा २) केदारी वाडा १०) कोळीवाडा ३) जेधेवाडा ११) गुळंबे वाडा ४) ब्राह्मणवाडा-२ १२) बाणेकर वाडा ५) शेरकर / कुदळे वाडा १३) चंपालाल शहा वाडा ६) शितोळे वाडा १४) राऊत वाडा ७) कुदळे वाडा १५) क्षिरसागर वाडा ८) सातव वाडा

शिक्षण आणि संस्था

2011 च्या जनगणनेनुसार, लवळे ची लोकसंख्या 7,353, घरांची संख्या 1,449 आहे. लिंग गुणोत्तर, बालसंख्या व समाजवर्ग यांचे तपशील उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गावातील इतर शैक्षणिक संस्था :- १) फ्लेम युनिव्हर्सिटी २) सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ३) भारती विद्यापीठ ४) आवसरीया स्कूल ५) संस्कृती स्कूल प्राथमिक शाळांची संख्या :- ३ पटावरील एकूण मुले :- ६६६ एकूण मुले :- ३४९ एकूण मुली :- ३१७ आंगणवाड्यांची संख्या :- ३ पटावरील एकूण मुले :- १२४ एकूण मुले :- ६० एकूण मुली :- ६८

आरोग्य, पायाभूत सुविधा आणि संपर्क

गावात प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत; स्थानिक सामाजिक व शैक्षणिक संस्थांनी (उदा. Dayanand Shikshan Prasarak Mandal) शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत.

धार्मिक-सांस्कृतिक जीवन आणि उत्सव

प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने जवळच्या शहरात उपलब्ध आहेत. गावात पथवाटा व पाणी सुविधा वाढल्याने लहान उद्योग व सेवाक्षेत्रात सुधारणा दिसते. लवळे गावातील देवदेवतांची मंदिरे १) रोटमलनाथ/ काळभैरवनाथ १३) श्री.लवळेश्वर महादेव मंदिर २) श्री. मोरया गणपती मंदिर १४) शितलादेवी मंदिर ३) श्री विठ्ठल मंदिर १५) श्री चौंडाई माता मंदिर ४ )श्री महादेव मंदिर १६) वेताळबाबा मंदिर ५) श्रीराम मंदिर १७) पांढरदेव ६) श्री हनुमान मंदिर १८) कानिफनाथ मंदिर ७) श्री लक्ष्मी देवी मंदिर १९) जानुबाई मंदिर ८) ज्ञानेश्वर महाराज मंदिर २०) वडजाई मंदिर ९) घुमट मंदिर २१) श्री नागोबा १०) श्रीनाथ म्हस्कोबा मंदिर २२) काळुबाई देवी ११) श्री सावता माळी मंदिर २३) श्री सती आई मंदिर १२) श्री तळजाई माता मंदिर २४) श्री दत्त मंदिर श्री सत्य सनातन लवळे गणपती मंदिराचा शोध / स्थानमहात्म्य :- या स्थानाचा भक्तराम मल्हारीच्या छपन्न कटावात उल्लेख आहे. या स्थानाचा स्कंदपुराणात उल्लेख आहे, असे म्हणतात. मोरया गोसावींनी आपल्या पोथीत या स्थानाचा उल्लेख केलेला आहे. मोरयांचा काल इ.स.१३७५ ते इ.स. १५६१ पर्यंत म्हणजे १८६ वर्षे एवढा होता. ते अगदी अखेरच्या कालखंडात या स्थानावर आले होते, असे गृहीत धरले तरी त्यास साडेचारशे वर्षाहून काळ लोटला आहे. मंदिराचे पौराणिक माहिती पुजारांना एकूण माहिती आहे. मूर्तीवर्णन :- लवळे मेन चौकाच्या दक्षिण बाजूच्या डोंगरावर पन्नास पायऱ्या चढून गेल्यावर खडकातच हा उत्तरमुखी गणपती आहे. मूर्ती बैठी असून पाय उकिडवे असल्यासारखे वाटतात दोन्ही पाय दोन्ही बाजूला. चतुर्भुज, गजमुख, लंबकर्ण डावीकडे नजर रोखलेली. हातातील परशु व अंकुश ही दोन शस्त्र साधारणता: ओळखता येतात मूर्ती उत्तरा भिमुख आहे गाभाऱ्याला जाळीचा दरवाजा आहे. मंदिर वर्णन :- केवळ सहा चौरस फुटाचे गर्भगृह त्यात घुमटी व घुमटीत मूर्ति आहे मंदिराचे बांधकाम अतिप्राचीन आहे. दीड चौरस फुटाच्या प्रचंड जाडीच्या शिळाचे भक्कम बांधणीचे मंदिर आहे. घुमटी गणेशाच्या भोवती खडकाच्या वरच्या अंगास बनविलेली आहे. खडकाच्या सभोवताली असे मंदिर आहे. मंदिर उंचावर डोंगरकडेला असल्याने मोठा सभामंडप बांधता आला नसावा. मात्र, दर्शनमंडप हाच सभामंडप असे गृहीत धरले तरी त्याची उंची तेवढी जास्त आहे, एवढेच मंदिराचा कळस विटांचा असावा. हा भाग नंतरचा वाटतो. गर्भगृहात एक मोठी पायरी चढून आत शिरावे लागते. दर्शनमंडपात येण्यासाठी चार पायऱ्या आहेत. गर्भगृहात घुमटीला कडया आहेत. सत्य सनातन गणपतीबाबत पूर्वी सोवळे कडक असावे. गर्भगृहात हवा यावी म्हणून एक चौरस फुटाची पूर्वाभिमुख खिडकी,यातून सूर्यप्रकाश मूर्तीजवळ पडतो. मंदिर उत्तराभिमुख बांधणीचे वाटत असले तरी पूर्व बाजूच्या दरवाजावर गणेशपट्टी असल्याने ते मुख्य प्रवेशद्वार असावे हे व उत्तरेकडचे द्वार उघडेच असते.पश्चिमे कडचे द्वार विटांनी बंद केलेले आहे. इथेच अत्यंत प्राचीन शाळूंका आहे. त्यावर असलेले पशुपतिनाथांचे गारेचे बाणलिंग आहे. मात्र, ते नंतरच्या काळात ठेवलेले असावे. मंदिरा सभोवतालीही डोंगरातच प्रदक्षिणा मार्ग खोदलेला आहे. मंदिरासभोवतालचा सारा भाग गायरान आहे. सरकारी मालकी आहे. मंदिराला अजिबात उत्पन्न नाही. मंदिर परिसराचे वर्णन :- इथे घोड्यांचे पाय खडकात उमटलेली दिसतात त्या परिसराला घोडेखडक म्हणतात. गारेच्या दगडांची वाटणारी खिचडी दाखवली जाते व याचा संदर्भ छत्रपती शिवाजी महाराज्यांचा मावळ्याशी सांगितला जातो. गावातले हिंदू भाविक लोक या स्थानावर मंगल कार्यास अक्षता देण्यास येतात. गणेश मंदिराकडून खाली उतरल्यावर पहिले ग्रामदैवत रोटमल नाथ मंदिर व पुढे गेल्यावर विठ्ठ्ल रुक्मिणीचे शंभर वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. बाजूच्या डोंगरात दत्त मंदिर आहे. डोंगरमाथ्यावरून हा सर्व परिसर अतिशय सुंदर दिसतो. अन्य काही प्राचीन मंदिरेही गावात आहेत. या मोरया गणपतीचा उत्सव गणेश जयंतीला करतात. प्रवास मार्ग :- पुणे स्वारगेट पासून २० किलोमीटर अंतरावर हे स्थान आहे. पिरंगुट आधी लवळे गावी जाण्यासाठी फाटा लागतो. जेमतेम अर्ध्या तासाची पायपीट करावी लागते. पी.एम.टी. मार्केट यार्ड (स्वारगेटच्या पुढे) 30 व 233 या क्रमांकाच्या बसेस दोन तासाच्या वेळफरकाने आहेत. अवांतर माहिती :- हा भाग रमणीय आहे रमेश देव व सीमा यांच्या प्रपंच चित्रपटाचे चित्रीकरण या गावात झाले. हे मंदिरही त्यात दिसते. तसेच पुजारीन हिंदी चित्रपटाचे चित्रीकरणही मध्यंतरी या गणपतीच्या परिसरात झाले. श्री. भैरवनाथ / रोटमलनाथ उत्सव रोटमलनाथ उत्सवाची सुरुवात अठराव्या शतकापासून सुरू झाली. चैत्र महिन्यातील कालाष्टमी या तिथीला काळभैरवनाथ / रोटमलनाथ यात्रा भरते. पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून रोटी या ठिकाणाहून रोटमलनाथ देव लवळे गावी आले. लवळे गावचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोना कालावधी वगळता आज रोजी पर्यंत एकाही वर्षी यात्रा रद्द झालेले नाही. लवळे गावचे ग्रामस्थ भक्तिभावाने वर्षभर पूजाअर्चा करत असतात. सर्व ग्रामस्थांना उत्सवाच्या वेळी खालीलप्रमाणे धर्मिक सेवा करत असतात. त्यामध्ये विशेषकरून खालीलप्रमाणे मानाची परंपरा आहे. १) शितोळे परिवार - पूजेचा मान. २) गावडे /मोरे परिवार - मंदिरात सजावट . ३) सातव परिवार - सनई चौघडा. ४) कोळी परिवार -पालखीचे भोई ( खांद्यावर पालखी प्रदक्षिणा .) ५) गावडे व दुधाळे परिवार- दिवटी लावणे. ६) आल्हाट परिवार – दीपमाळ लावणे. ७) पारखी ( सोनार )- देव उजळणे. देवाचा मुखवटा:- देवाचा मुखवटा वर्षभर सांभाळण्यासाठी गावडे परिवार यांच्याकडे असतो व उत्सवाच्या वेळी पालखीतून मुखवट्याची मिरवणूक गावातून काढली जाते. सप्ताह :- यात्रेनिमित्त चैत्र पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून सप्ताह सात दिवसांचा सप्ताह चालू होतो. पहिल्या दिवशी:-आठवडाभर हरिपाठ भजन कीर्तन चालू राहते. दर दिवशी अन्नदान होतअसते. उत्सवा दिवशी ( कालाष्टमी) महापूजा व अभिषेक होतो. देवाला नैवेद्य, मानपान,नवस फेडणे इ. कार्यक्रम होतात. रात्री ८.३० वाजता पालखी मिरवणूक (छबिना ) असतो. यानंतर रात्रभर भजन/ जागर होते. सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत दरवर्षी तमाशा ठेवला जातो. दुसऱ्या दिवशी:- लवळे गावचे वैशिष्ट्य म्हणजे कोरोना कालावधी वगळता आज रोजी पर्यंत एकाही वर्षी यात्रा रद्द झालेले नाही. तसेच यात्रेच्या दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरतो. लवळे गावचे ग्रामस्थ भक्तिभावाने वर्षभर या ग्रामदैवताची पूजाअर्चा करत असतात. तसेच नाथ म्हस्कोबा देवांचा छबीना रंगपंचमीला निघतो. परंपरा:- पूर्वीच्या काळी दसरा व दिवाळीच्या दरम्यान भूत्या गावातून फिरून तेलधान्य गोळा करून कुंभार परिवाराच्या घरी मुक्कामी राहत असायचा. हि परंपरा आजही चालू आहे. तसेच पूर्वीच्या काळी गोंडे नावाचे लोक कोतवाला सोबत भिक्षा मागत असत. मातंग समाज्याच्या घरी मुक्काम करत असत.