भौगोलिक माहिती
स्थानिकता
लवळे हा गाव पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात येतो. गावाला लवळे नाव का पडले? याविषयी माहिती पूर्वी गावच्या परिसरात लव्हाळे वनस्पतीचे बेट होते. गावची भौगोलिक रचना महादेवाच्या पिंडाच्या आकाराची आहे. तसेच पूर्वीपासून लवळेश्वर हे महादेव मंदिर गावामध्ये स्थित आहे. या बाबीमुळे गावाचे नाव “लवळे” असे पडले आहे. समाजव्यवस्था परिसरात ‘एक लवळे - बारा मावळे’ असे लवळे गावाला आजही संबोधले जाते. याचे कारण असे कि, लवळे गावात आजही बारा बलुतेदार ( अठरा पगड जातीचे ) लोक या गावात राहतात. त्यामध्ये विशेषकरून मराठा – देशमुख, माळी, ब्राह्मण, नव बौद्ध, मातंग, चर्मकार , मुस्लिम , बारा बलुतेदार- कुंभार, सुतार ,कोळी, परिट, न्हावी, सोनार, धनगर, जंगम, भराडी, गुरव, रामोशी, कैकाडी ;इतर समाज- कातकरी, नंदीबैलवाले, भुते
भौगोलिक संरचना
लवळे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० ते ७०० मीटर उंचीवर स्थित आहे. अक्षांश :-७३.५२ रेखांश :-३२.६९ गावाचे क्षेत्र / जमिनीची माहिती :- अ लागवडी करीता जमीन क्षेत्र (हे.आर ) १ भोगवट दार ,वर्ग एक ११६९ २ भोगवट दार ,वर्ग दोन ३३७ ३ सरकारी आकारी पड ०.५६ ४ बिन भोगवट्याची १.७२ ५ दुमजला/ देवस्थान क्षेत्र ३० एकूण १५३८ ब लागवडीसाठी अनुपलब्ध जमीन १ पोटखराबा १५७ २ नद्या व नाले ४५ ३ सरकारी गायरान ७.३२ ४ रस्ते व मार्ग ९.७३ ५ शाळा १८४ ६ गावठाण १६ एकूण ४१९ एकूण क्षेत्र (अ+ब ) १९५७
जलवायू
लवळे मध्ये उन्हाळ्यात तापमान ३५-४०°C आणि हिवाळ्यात १०-१५°C असते. अक्षांश :-७३.५२ रेखांश :-३२.६९ एकूण सार्वजनिक विहिरी :- २ पाणी पिण्यायोग्य विहिरी :- २ एकूण हातपंप :- १८ नळ पाणीपुरवठा योजना :- ३ टाकीची क्षमता :- ३ लाख लिटर (गावठाण) राऊत वाडी :- ७० हजार लिटर गावडेवस्ती :- १० हजार लिटर पिण्याचे पाणी जुन्या काळी ग्रामस्थ गावच्या सार्वजनिक विहिर “गाव डवरा” आणि घुमटाच्या मागील झऱ्यावर बांधलेल्या टाकीवरून पिण्यासाठी डोक्यावरून हंड्याने पिण्याचे पाणी वाहतूक करत असे.
कृषी
लवळे मधील प्रमुख व्यवसाय शेती आहे. शेती लवळे गावी प्रामुख्याने पूर्वीपासून शेती हा मुख्य व्यवसाय आज पर्यंत चालू आहे. मुळशी तालुक्यामध्ये बागायती गाव म्हणून लवळे गावचे नाव प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पेरू, वांगी, कडबा (ज्वारी), भात, घेवडा प्रमुख पिके भरपूर प्रमाणात उत्पादित होत असल्याने ट्रक भरून मुंबई, गुजरात, पुणे या ठिकाणी विक्री साठी जात होती. तसेच जुन्या काळी ग्रामस्थ बैलगाडीने आणि डोक्यावरून शेतमालाची विक्री पुणे येथे करत होते. बैल मोटीने शेतीसाठी विहिरीतून पाण्याची व्यवस्था होत होती. सन १९६२ साली शेतकऱ्यांनी एकत्र येऊन संत सावता माळी सह. सिंचन पाणीपुरवठा योजना मुळा नदीवरून केली. त्यांचे उद्घाटन तत्कालीन आमदार मामासाहेब मोहोळ यांनी केले. तेव्हापासून लवळे गावाचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आले. व शेतीपिकाची भरभराट झाली.
प्राकृतिक साधनांची उपलब्धता
लवळे च्या आजूबाजूला काळी व लाल माती आहे.
संस्कृती आणि इतिहास
लवळे मध्ये ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे आढळतात.सांप्रदायिक तुकाराम बीज :- सन १९२३ ला तुकाराम बीज सप्ताह देहू या ठिकाणी लवळे ग्रामस्थांच्या वतीने सुरू करण्यात आली. त्या कालावधीपासून संत ज्ञानेश्वर माऊली मंदिरातील महापूजेचा मान लवळे येथील ग्रामस्थांना मिळालेला आहे. तो आज पर्यंत चालू आहे. त्या काळी लवळे गावातून वाहतूक/दळणवळण व्यवस्था पूर्वी नव्हती. त्या काळी ग्रामस्थ घोड्यावरून साहित्य वाहतूक व येजा करीत असत. नंतरच्या काळात बैलगाडी हे वाहतुकीचे साधन झाले. पुढील कालावधीमध्ये कै.सोपानराव सातव, कै.साहेबराव क्षिरसागर, कै. पांडुरंग राऊत, कै. दत्तात्रय गुगळे, कै.तुकाराम ननावरे, कै.किसन शितोळे (पाटील), कै.बोल्हू राऊत, कै.रावसाहेब शितोळे, कै.विठोबा राऊत, कै.सोपान काशीलकर, कै.अमृता कुदळे, कै.सोपान तुकाराम राऊत, कै. राघू गणपती कुदळे, कै.दामू घुटकुले, कै.भाऊ शेळके, कै.मनोहर शितोळे, कै.सदाशिव शितोळे, कै. प्रतापराव शितोळे , कै.रामभाऊ घुणे, कै. साहेबराव गावडे, कै. सखाराम पांढरे, .बबन गणपती राऊत यांनी हि परंपरा जतन केली. सध्या श्री. एकनाथ राऊत आणि श्री.हिरामण दादा कळमकर ( वय वर्ष ८६) यांनी ती परंपरा चालू ठेवली. या सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शनाखाली ही परंपरा आजही चालू आहे. गेल्या दहा वर्षापासून लवळे येथील ज्ञानेश्वर मंदिरामधून देहू येथे पायी वारी सुरुवात करण्यात आली. ही पायी वारीची परंपरा लवळे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने व अभिमानाने आज रोजी पर्यंत चालू ठेवलेली आहे. सन २०२३ ला शताब्दी / शंभर वर्ष सोहळा ग्रामस्थांच्या वतीने साजरा करण्यात येणार आहे. पंढरपूरची पायी वारी परंपरा लवळे गावातून पंढरपूर पायी वारीला साधारणत: सन १८३१ सालापासून सुरुवात झाली. त्या काळातील कै. बाळाजी राऊत, कै.भिकोबा केदारी, कै. तुळशीराम कुदळे, कै. शंकर रानोजी सातव, कै. नामदेव रखमाजी सातव यांनी पायी वारीला सुरुवात केली. बैलगाडी हे त्यावेळचे दळणवळणाचे मुख्य साधन होते. लवळे गावचा गो-हेकर दिंडी मध्ये असतो. गो-हेकर दिंडीचा क्रमांक ११ माऊलीच्या रथामागे असतो. नंतरच्या कालावधीमध्ये गो-हेकर दिंडीला पायी वारी व्यवस्थेसाठी आर्थिक अडचण निर्माण झाली. त्यावेळी लवळे गावातील कै. सोपानराव मुकिंदा सातव यांनी सहकार्य करून गो-हेकर दिंडीला आर्थिक मदत केली. पंढरपूर येथे निर्माण झालेली धर्मशाळा उभारणी मध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आजही गो-हेकर दिंडीमध्ये लवळे गावचे कै. सोपानराव मुकिंदा सातव आणि त्यांच्या वारसांना मानाचे स्थान आहे. तसेच पंढरपूर येथील विठ्ठल रखुमाई महापूजेचा मान त्यांना मिळाला आहे. गावाचे थोर व्यक्तिमत्व *रामा नामा लवळेकर:- हे लवळे गावचे एक प्रसिद्ध तमाशगीर होते. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी गावोगावी तमाशे केले. त्यामुळे लवळे गावचे नाव प्रसिद्ध झाले. *सरकार शितोळे :- *सुदाम मारुती कुदळे:- लवळे गावचे प्रसिद्ध कुस्तीगीर. १९६० नंतर त्यांनी गावोगावी जाऊन कुस्त्यांचे मैदान गाजवले आणि लवळे गावाचे नाव प्रसिद्ध केले. मृत्यू :- २/८/१९७५. *पांडुरंग मारुती राऊत:- हे लवळे गावचे सुपुत्र, पंचायत समिती मुळशीच्या सभापती पदी सलग ११ वर्षे विराजमान होते. लवळे ग्रामपंचायतीचे दि. १०/०१/१९६२ ते १०/६/१९८२ या सलग कालावधीत ते गावचे सरपंच होते. त्यांनी त्यांच्या पदावधीत लवळे गावची खरी जडण घडण केली. संत सावता महाराज विविध कार्यकारी सोसायटी स्थापन केली. महात्मा फुले विद्यालय लवळेचे ते संस्थापक अध्यक्ष होत. त्याच बरोबरत्यांनी गावची पाणीपुरवठा व्यवस्था, सार्वजनिक इमारती, रस्ते व गटरची व्यवस्था, दळणवळणाची साधने, शैक्षणिक सुविधांची निर्मिती केल त्यांचे वडील मारुती राऊत हे लवळे गावचे प्रसिद्ध बागायतदार होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या कालवधीत लवळे गावी भेट दिली.